Dry Fruits : ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी घातक की फायदेशीर?
सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स (Dry Fruits) आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचा आहे. याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदाम, काजू, खजूर, अक्रोट, पिस्ता यांसारख्या ड्रायफ्रूट्समध्ये अनेक पोषक तत्व असतात. ड्रायफ्रूट्सचं वैशिष्ट्य म्हणजे हे तुम्ही नुसतेही खाऊ शकतात. तसेच यापासून एखादा पदार्थ देखील तयार करू शकता.
खारीकमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. हे सर्व पोषक घटक तुम्हाला हेल्दी राहण्यास फार उपयुक्त आहेत.
खारीकमध्ये असणारे पॉलिफेनल्स डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतात. याशिवाय शरीराला डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात. पाचनशक्तीच्या संबंधित सुद्धा समस्या दूर ठेवतात.
पिस्तामध्ये पोटॅशियम, हेल्दी फॅट, एन्टी इंफ्लेमेट्री आणि एन्टी ऑक्सिडेंट यांसारखे गुण असतात. जे तुमच्या हृदयाला हेल्दी ठेवण्याचं काम करतात. वजन कमी करण्यासाठीदेखील पिस्ता फार फायदेशीर आहे.
कारण यामध्ये असलेले हाय प्रोटीन आणि फायबर क्वालिटीमुळे तुम्हाला वेळोवेळी भूक नाही लागत. पिस्त्यामध्ये सोडियमचं प्रमाण देखील असतं यामुळे अगदी कमी प्रमाणात पिस्ता खावा. जास्त मिठाचं प्रमाण तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
काजू हे सुद्धा इतर ड्रायफ्रूट्समध्ये पौष्टिक आहे. हे मॅग्नेशियम, तांबे आणि मॅंगनीजने समृद्ध आहे. हाडांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी काजू कार्य करते.
चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी आणि रक्तदाब कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी काजू प्रभावी आहेत. ते उर्जेचा एक चांगला स्त्रोत देखील आहेत. मात्र, कच्च्या काजूमध्ये मीठ आणि तेलाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तुम्ही ते भाजून खाऊ शकता.
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी बदामाचा वापर केला जातो. रात्रभर बदाम पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर सकाळी ते खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते, जे स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी उपयुक्त आहे.