Custard Apple benefits : उत्तम आरोग्यासाठी सिताफळ गुणकारी; पाहा फायदे
आपल्या देशात ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात सिताफळ बाजारात सहज उपलब्ध होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिताफळ खाल्ल्याने उच्च रक्तदाबापासून ते खराब पचनापर्यंतच्या अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत होते.
एका अभ्यासानुसार, एक सिताफळ खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीचे 24 टक्के व्हिटॅमिन-B6 एका दिवसात पूर्ण होते.
सिताफळ हृदय निरोगी ठेवण्यास आणि कर्करोगाच्या पेशी थांबविण्यास खूप फायदेशीर आहेत.
सिताफळमध्ये अँटिऑक्सिडंट्स खूप चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यात फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोइड्स, कायरेलोइक अॅसिड आणि व्हिटॅमिन-सी असतात.
जे शरीरात उत्तम अँटिऑक्सिडेंट बनवते. यामुळे, सिताफळाचे सेवन केल्याने त्वचेचे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण होते.
सिताफळसारखी फळे खाल्ल्याने तुम्ही उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण ठेवू शकता. सिताफळमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप चांगले आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.