Copper Deficiency : तुमच्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे तांबे, याच्या कमतरतेमुळे दिसून येतात ही गंभीर लक्षणे
शरीरात तांब्याच्या कमतरतेमुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होते आणि यामुळे तुम्ही आजारी पडू शक्यता वाढते. यासोबत शरीरातील अनियंत्रित उर्जेच्या पातळीमुळे अशक्तपणा जाणवतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतांब्याच्या कमतरतेमुळे शरीरात लोहाचं प्रमाणही कमी होऊ शकते.यामुळे तुम्हाला अॅनिमियाच्या समस्या निर्माण होते आणि अनेक आरोग्यदायी तक्रारी वाढायला सुरूवात होते.
शरीरात तांब्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला हाडाच्या सांध्यांशी संबंधित समस्येला सामोरं जावं लागू शकतं.यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास संभवतो.
शरीरात तांब्याची कमतरता असेल,तर हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात. यामुळे व्यक्तीला ऑस्टियोपोरोसिसच्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं.
शरीरातील तांब्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला प्रमाणाबाहेर थकवा जाणवतो.
खरंतर, शरीरात तांब्याचं संतुलित प्रमाण नसेल, तर तुमच्या आतड्यांना लोहाचं योग्य प्रमाणात शोषण करून घेता येत नाही. यामुळे सतत अशक्तपणा जाणवतो.
शरीरात तांब्याची कमतरता निर्माण झाल्यास डार्क चॉकलेट खाल्यामुळे फायदा होऊ शकतो.
यासोबत दररोजच्या आहारात बटाटे, पालक, हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, काजू आणि ऑर्गन मीट इत्यादी अन्नपदार्थ योग्य प्रमाणात आहारात समावेश केला तर फायदा होऊ शकतो.