Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : ओठ सांगतात तुमच्या आरोग्याचे रहस्य, जाणुन घ्या कसे?
ओठ काळे होत आहेत! तेव्हा काळजी घ्या. कारण हे आजाराचे लक्षणं असू शकते. खरं तर ओठांचा रंग बदलणे हे गंभीर आजारासाठी कारणीभूत असू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएखादा रूग्ण जेव्हा आजारी पडतो त्यावेळी डाॅक्टर जीभ आणि डोळे पाहून रूग्णांना सांगतात. त्याचप्रमाणे ओठांवरून देखील समजते की, तुम्ही आजारी आहेत.
कधीकधी अशी परिस्थिती देखील उद्भवते जेव्हा आपल्या ओठांचा रंग पांढरा किंवा जांभळा दिसू लागतो, अशा परिस्थितीत यामागील कारण काय आहे, चला जाणून घेऊया.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ओठांचा रंग बदलणे हे खरे तर शरीरातील आजारांचे लक्षण आहे, म्हणजेच तुमचे ओठ लाल-पिवळे किंवा काळे दिसू लागले तर समजून घ्या की तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
जर तुमचे ओठ लाल असतील तर समजा तुम्हाला यकृताशी संबंधित काही आजार आहे. साधारणपणे ओठ गुलाबी दिसायला हवेत, पण जर ओठ लाल झाले तर यकृताचा त्रास होऊ शकतो.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा आपल्या यकृतामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवते तेव्हा ओठांचा रंग लाल होऊ लागतो, हा स्पष्ट संदेश आहे की शरीराला कोणत्या ना कोणत्या ऍलर्जीचा त्रास होत आहे.
अनेकदा ओठ काळे व्हायला लागतात. बऱ्याचदा ब्युटी प्रोडक्ट्स अति वापरल्याने देखील ओठ काळे पडतात. तर धुम्रपान केल्याने सुध्दा ओठ काळे होतात.
जेव्हा तुमच्या ओठांचा रंग पिवळा आणि पांढरा होऊ लागतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुम्ही अॅनिमियाचे शिकार आहात.
अशक्तपणाचा त्रास झाल्यानंतर, रक्त कमी झाल्यामुळे ओठ पांढरे होतात. याशिवाय जेव्हा बिलीरुबिनची पातळी वाढू लागते तेव्हा आपले ओठ पांढरे होऊ लागतात.
त्यामुळे ओठांच्या रंगात होणारे बदल लक्षात घेणे गरजेचे आहे.