Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kids Lunchbox Tips : जर तुम्ही मुलांसाठी लंचबॉक्स खरेदी करत असाल तर तो कसा खरेदी करायचा ते जाणून घ्या
लंच बॉक्स हा जवळपास सर्वच शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आवश्यक वस्तूंपैकी एक आहे. मुले दुपारचे या लंच बाॅक्समध्ये घेऊन जातात. मुलांच्या जेवणाशी हे संबंधित असल्याने जेवणाचा डबा निवडताना खूप काळजी घेतली पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजारात विविध प्रकारचे लंच बॉक्स उपलब्ध आहेत. परंतु योग्य आणि दर्जेदार लॉन्च बॉक्स निवडणे महत्वाचे आहे. जेवणाच्या डब्याचा दर्जा चांगला असावा जेणेकरून मुलांचे अन्न सुरक्षित ठेवता येईल.
याशिवाय बॉक्सचा आकार, रंग, डिझाईन इत्यादी बाबीही मुलाच्या वयानुसार आणि आवडीनुसार निवडल्या पाहिजेत. जेवणाचा डबा खरेदी करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
जेवणाचा डबा खरेदी करताना सर्वप्रथम त्याचा दर्जा तपासा. उत्तम दर्जाचा जेवणाचा डबा स्टीलचा असावा. गुणवत्ता चांगली नसल्यास, लंचबॉक्स लवकर खराब होऊ शकतो किंवा मुलाच्या अन्नास हानी पोहोचवू शकते.
जेवणाचा डबा खरेदी करताना मुलाच्या वयानुसार आणि आवडीनुसार बॉक्सचा आकार आणि डिझाइन निवडले पाहिजे. लहान मुलांसाठी लहान आकाराचा आणि रंगीत डिझाइन केलेला बॉक्स योग्य आहे. मोठ्या मुलांसाठी, थोडा मोठा आणि डिझाईनन नसलेला लंच बाॅक्सही चालू शकतो.
लहान मुलांसाठी जेवणाचा डबा खरेदी करताना, बॉक्समध्ये वेगवेगळे कप्पे असावेत, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. लहान मुले स्वतःचे अन्न स्वतः हाताळू शकत नाहीत, त्यामुळे खाण्याचे पदार्थ डब्यात व्यवस्थित वेगळे ठेवता येतात. यामुळे अन्नपदार्थ एकमेकांत मिसळणार नाहीत.
जेवणाचा डबा खरेदी करताना, बहु-रंगीत डिझाईन्स टाळा. अनेक रंग असलेल्या प्लास्टिकच्या लंच बाॅक्सचे रंग लवकर फिके पडतात. त्यामुळे अन्नपदार्थ खराब होऊ शकतात. साध्या किंवा मॅट फिनिशसह लंच बॉक्स घेणे चांगले आहे.
लंच बाॅक्स खरेदी करताना त्याचे झाकण नेहमी चेक करून पाहावे. जर खूप घट्ट जेवणाचा डबा असेल तर मात्र मुलांना मोठी अडचण येऊ शकते. त्यासाठी कायम लंच बाॅक्स खरेदी करताना काळजी घ्यावी.
मुलांकरता प्लॅस्टिकचे डबे खरेदी करणे बंद करा. प्लॅस्टिकच्या डब्यात ज्यावेळी गरम अन्न ठेवले जाते. त्यावेळी त्यातील रसायनांचा त्यावर परिणाम होतो.
लंच बाॅक्सवर जास्त पैसे वाया घालवू नयेत. मुलं अनेकदा शाळेतच डबे विसरून येतात. त्यामुळे शक्यतो स्वस्त डबे खरेदी करा.