Cinnamon Benefits : सर्दी, कफच्या समस्येपासून सुटका हवीय? हिवाळ्यात 'असा' करा दालचिनीचा वापर
दालचिनी हे झाडाच्या सालीपासून तयार करतात. मसाल्यातील तमालपत्र तुम्हाला माहित असेल. या तमालपत्राच्या झाडाच्या सालीला सुकवल्यावर त्यालाच दालचिनी असं म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदालचिनी वात आणि कफ दोष दूर करण्यात फायदेशीर आहे. मात्र, याच्या अधिक सेवनाने पित्ताची समस्या उद्धवू शकते. त्यामुळे याचं सेवन योग्य प्रमाणात करणं आवश्यक आहे.
दालचिनी वात आणि कफ नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजेच या दोन्ही दोषांमुळे होणारे आजार दालचिनीच्या सेवनाने आटोक्यात ठेवता येतात.
दालचिनी हा अतिशय गरम मसाला आहे. याचे जास्त सेवन केल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ, त्वचेवर खाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. म्हणून, दररोज मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
एक व्यक्ती एका दिवसात दालचिनीचा एक इंच मोठा तुकडा खाऊ शकतो. तुम्ही दालचिनी पावडर वापरत असाल तर दिवसभर सामान्य आकाराच्या चमचे वापरा.
थंडीच्या मोसमात घसा खवखवणे, कफ, सर्दी किंवा तापाची समस्या उद्भवते. थंड वाऱ्यांमुळे शरीराचे तापमान झपाट्याने कमी होते आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो.
अशावेळी तुम्ही दालचिनीची वापरू शकता. यासाठी तुम्ही एक चतुर्थांश चमचा (1/4) दालचिनी पावडर एक चमचा मधात मिसळा. हे मिश्रण बोटाच्या साहाय्याने हळूहळू चाटून खा. सकाळी नाश्त्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करा. तुम्हाला लवकरच याचा फायदा जाणवेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.