Dadar Chaityabhoomi: महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मृतिस्थळाला राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यत्री यांनी भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले. ( Photo Credit : Twitter/@mieknathshinde )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच यावेळी पोलीस दलाच्या वतीने विशेष मानवंदनाही देण्यात आली. तसेच शांततेचे प्रतिक म्हणून हवेत फुगे सोडण्यात आले. याप्रसंगी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनास मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ( Photo Credit : Twitter/@mieknathshinde )
यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे,आमदार आशीष शेलार,आमदार प्रवीण दरेकर, आमदार कालिदास कोळंबकर,मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल उपस्थित होते. ( Photo Credit : Twitter/@mieknathshinde )
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. ( Photo Credit : Twitter/@mieknathshinde )
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. ( Photo Credit : Twitter/@mieknathshinde )
इतकंच नव्हे तर त्यांना 'भारतीय राज्यघटनेचे जनक' म्हणूनही ओळखलं जातं. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. ( Photo Credit : Twitter/@mieknathshinde )
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. ( Photo Credit : Twitter/@mieknathshinde )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ( Photo Credit : Twitter/@mieknathshinde )