Health Tips : निरोगी केसांपासून ते रक्त शुद्धीकरणापर्यंत कडुलिंबाच्या पानांचा 'असाही' होतो वापर; एकदा वापरून पाहाच
कडुलिंब एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात याला विशेष महत्त्व आहे. कडुलिंबात 130 हून अधिक जैविक ॲक्टिव कंपाउंड्स असतात. कडुलिंबाचा आपल्याला कसा फायदा होतो ते जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकडुलिंबाला आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व आहे. कडुलिंबाचा उपयोग अनेक छोट्या-मोठ्या आजारांवर उपाय म्हणून केला जातो. इतकंचनाही तर याचा उपयोग सौंदर्य वाढवण्यासाठीही केला जातो. कडुलिंबाच्या काडांच्या वापर दात साफ करण्यासाठीही केला जातो. कडुलिंबाच्या झाड्या पानापासून खोडापर्यंतचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. कडुलिंबाच्या पानांचा काय फायदा आहे जाणून घ्या.
कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असण्याबरोबरच अँटी ऑक्सिडेंट्सही मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
याबरोबरच ही पानं पेशींना होणारं नुकसान टाळण्याचंही काम करते. कडुलिंबाची ताजी पाने बारीक करून त्यात मध टाकून रोज खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. मात्र, जास्त कडुलिंब आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून आंघोळ करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. कडुलिंबाची पानं रक्त शुद्ध करण्यासाठी उपयोगी मानली जातात. जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर तुम्ही बाजारात मिळणारे कडुलिंबाचे सरबत डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. यामुळे तुम्हांला मुरुमांपासून सुटका मिळेल.
कडुलिंबाची ताजी पाने वाटून तुम्ही केसांवर आणि टाळूवर लावू शकता. यामुळे कोंडा कमी होईल आणि केसही निरोगी राहतील.
दात आणि हिरड्यांसाठीही कडुलिंब उत्तम मानला जातो. कडुलिंबाच्या काडीने दात स्वच्छ करणे चांगलं मानलं जातं. यामुळे बॅक्टेरियापासून सुटका होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.