Cabbage Soup Benefits : निरोगी राहण्यासाठी प्या कोबीचे सूप, वजन कमी करण्यासाठी सोपा आणि प्रभावी उपाय
आजकाल अनेकांना मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे आजार होत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अस्वस्थ जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी. अशा परिस्थितीत पोषक तत्वांनी समृद्ध हिरव्या भाज्या अतिशय फायदेशीर मानल्या जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया भाज्यामध्ये प्रामुख्याने विशेषतः कोबी आरोग्यास फायदेशीर मानला जातो. जरी अनेकांना त्याची चव आवडत नसली तरी ते तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो. कोबीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे ए, सी आणि के यासह अनेक पोषक घटक असतात.
कोबीचे सूप तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी देखील मदत करू शकते. याचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. 5 दिवस सतत सेवन केल्यास त्याचा परिणाम दिसून येतो. कोबी सूप किती फायदेशीर आहे? हे पिल्याने कोणत्या रोगांपासून आराम मिळतो? सूप बनवण्याची पद्धत काय आहे? जाणून घेऊयात.
तज्ज्ञांच्या मते, कोबीचे सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे सूप 5 दिवस नियमित प्यायल्याने शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. या सूपमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आढळतात. यामुळे शरीराला होणारी हानी टाळता येते.
कोबीचे सूप शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. व्हिटॅमिन सीसह अनेक प्रभावी घटक कोबीच्या सूपमध्ये आढळतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. विशेषत: बदलत्या ऋतूंमध्ये संसर्ग टाळण्यासाठी याचे सेवन केले जाते. यामुळेच हे सूप प्यायल्याने आजार दूर राहतात.
कोबीचे सूप पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. खरतर कोबीच्या सूपमध्ये फायबरसोबतच असे अनेक पोषक घटक आढळतात. हे सूप नियमित प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, त्यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्याही दूर होतात.
शरीराचे वाढते वजन कमी करण्यासाठी कोबीचे सूप देखील फायदेशीर मानले जाते. अशा परिस्थितीत ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
या सूपमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. हे सूप नियमित प्यायल्याने भूक कमी होऊ शकते. यामुळे तुम्हाला तुमचे पोट भरलेले जाणवते.
सूप बनवण्याची पद्धत - कोबीचे सूप बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. हे करण्यासाठी, प्रथम कोबीचे लांब तुकडे करा. हे तुकडे बारिक करा. हे तुकडे 6-7 कप पाण्यात टाका आणि उकळण्यासाठी गॅसवर ठेवा.
यासोबत थोडा कांदा, काळे मीठ आणि मिरपूड घाला. आता हे सूप थोडे घट्ट करण्यासाठी त्यात अर्धा चमचा मधही घालू शकता. ते काही वेळ व्यवस्थित शिजवा आणि प्या.