Back pain : रोजची 'पाठदुखी' असह्य होते? 'हे' आहेत रामबाण उपाय..
जास्त प्रमाणात पाठदुखी होत असेल तर नियमित योगासने करा, त्यामुळे स्नायूंची क्षमता वाढते आणि पाठीचा कणा लवचिक बनतो. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएखादी जड वस्तू उचलायची असेल तर गुडघ्यात वाका,त्यामुळे पाठ सरळ राहते. (Photo Credit : unsplash)
पाठदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी सतत काम करणे चुकीचे आहे. कामात काही वेळाची विश्रांती आवश्यक असते, त्यामुळे पाठ आणि मानेला आराम मिळतो. कामात १ तासाच्या अंतराने ब्रेक घेणे आवश्यक आहे. (Photo Credit : unsplash)
कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3 आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. या पोषक घटकांमुळे हाडे मजबूत राहतात. (Photo Credit : unsplash)
योग्य प्रकारे रक्ताभिसरण होण्यासाठी मान, खांदे आणि पाठीमागे स्ट्रेच करा. पाठदुखी असेल तर उंच टाचांच्या चपला टाळा आणि शूज घाला. आरोग्यास उत्तम राहील. (Photo Credit : unsplash)
पाठ दुखीची समस्या असलेल्या लोकांनी मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे उत्तम राहते. दररोज आंघोळीच्या पाण्यात थोडेसे खडे मीठ टाकून आंघोळ करा, त्यामुळे स्नायू मोकळे होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)
एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. ठराविक वेळाने बसण्याची स्थिती बदला. गाडी चालवताना, झोपताना, बसताना पाठीला आणि कंबरेला आधार द्या. (Photo Credit : unsplash)
पाठदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी चालताना आणि बसताना पाठ सरळ ठेवा, त्यामुळे पाठीचा कणा ताठ राहतो. (Photo Credit : unsplash)
पाठ दुखीचा त्रास होत असल्यास रोज झोपताना नारळाच्या आणि मोहरीच्या तेलाने पाठीला मालिश करा. (Photo Credit : unsplash)
पाठदुखीवर गरम पाण्याने शेक द्या. तसेच तुम्ही पाठ बर्फानेही शेकवू शकता, त्यामुळे वेदना कमी होऊन पाठीला आराम मिळतो. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)