Parenting Tips : मुलांचं अभ्यासात मन रमत नाही? 'ही' 3 आहेत त्यामागची कारणं; वेळीच ओळखा
आजकाल पालकांची मोठी तक्रार असते की, मुले अभ्यास करत नाहीत. ते वाचनाचा, लिहिण्याचा कंटाळा करतात. त्यांना अभ्यास करणं म्हणजे खूप मोठे कामं वाटते. एवढेच नाही तर वर्गात मुलं लक्ष देत नसल्याचीही शाळेकडून देखील तक्रार येत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाधारणपणे अशा तक्रारींमुळे केवळ पालकच नाही तर मूलही तणावाखाली असते आणि त्यांच्यासाठी पुस्तके, क्लास, अभ्यास, हे सर्व तणावपूर्ण वाटू लागते. अशा परिस्थितीत ते अशा वातावरणापासून दूर पळू लागतात आणि पुस्तके पाहताच त्यांचा अभ्यासातील रस कमी होतो किंवा काहीतरी नवीन शिकण्याचा आत्मविश्वास कमी होतो.
अभ्यासाबद्दल बोलत असताना पालकांनी त्यांना शिव्या देत राहिल्यास किंवा रागावत राहिल्यास घरातील वातावरण नकारात्मक आणि तणावपूर्ण बनते. त्यामुळे मूल अभ्यासावर लक्ष केंद्रित करु शकत नाही. त्यामुळे त्यांना अभ्यासाच्या नावाखाली चिडचिड होऊ लागते आणि ते वाचन-लेखनावर लक्ष देत नाही.
अनेक पालक शिकवताना संयम गमावतात आणि प्रत्येक गोष्टीत दोष शोधत राहतात. उदाहरणार्थ, काही चुका होत असतील तर ते मुलाला दोष देऊ लागतात की तुम्ही अभ्यासात लक्ष देत नाही, किंवा तुम्हाला हे माहिती आहे पण लक्ष केंद्रित करायचे नाही.
अनेकदा पालकांना अभ्यासाची इतकी काळजी वाटू लागते की ते दिवसभर मुलांशी अभ्यासाबद्दल बोलत राहतात. यामुळे त्यांची चिडचिड होते आणि त्यांचा अभ्यासातील रस कमी होतो.
अनेकदा पालक आपल्या मुलांना त्यांच्या वर्गात असणाऱ्या इतर मुलांसोबत तुलना करतात. या कारणाने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. यामुळे मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करु शकत नाही.
मुलांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याकरता पालकांनी काय करावे. जाणून घ्या.
अभ्यासादरम्यान चिंता किंवा तणावाचे वातावरण निर्माण करु नका. अभ्यास करताना स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
त्यांची इतर मुलांशी तुलना करु नका. चांगले गुण ही यशाची आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली नाही हे नेहमी लक्षात ठेवा.
अभ्यासाच्या वेळी वातावरण आनंदी ठेवा. त्यामुळे त्यांचा मेंदू चांगला काम करेल आणि त्यांना अभ्यासाचा कंटाळा येणार नाही.