Health Tips : निरोगी शरीरासाठी अंजीरचे फायदे; अनेक समस्यांवर आहे रामबाण उपाय
अंजीर हे मध्य पूर्व आणि पश्चिम आशियातील एक गोड आणि रसाळ फळ आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंजीर हे एक असं फळ आहे जे तुम्ही ताजे, सुकलेले किंवा शिजवलेले सुद्धा खाऊ शकता.
अंजीरमध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. याशिवाय, त्यात व्हिटॅमिन ए, सी, ई, के, बी6, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारखे आवश्यक पोषक घटक असतात.
पचनास मदत करणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याबरोबरच अंजीरचे अनेक फायदे आहेत. हे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी देखील उपयोगी फळ आहे. तुम्ही ताजे किंवा कोरडे कसेही अंजीर खाऊ शकता.
अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पचन, हृदयविकार, हाडांचे आरोग्य असे हे खाण्याचे अनेक फायदे आहेत.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करत असाल तर त्यातील हर्बल गोडवा आणि त्यात आढळणारे गुणधर्म तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
अंजीरमध्ये भरपूर फायबर असते. जे तुमच्या बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी पुरेसे आहे. बद्धकोष्ठता दूर करण्याबरोबरच ते आतड्यांसाठीही खूप चांगले आहे.
अंजीर हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. हे बीपी नियंत्रित करते, त्यात भरपूर इलेक्ट्रोलाईट्स आणि पोटॅशियम असते. त्यामुळे रक्ताला मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात मिळतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.