Alo Vera Benefits : कोरफडचे एक, दोन नाही तर आहेत अनेक फायदे

कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला, दमा, सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त ठरते. श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, अॅसिडीटी, मूळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रकिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते. दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मूळव्याधी असे आजार कमी होतात.

मोबाईल, कॉम्प्युटर यांच्या अतिवापरामुळे किंवा झोप न झाल्याने डोळे चुरचुरत असतील, तर पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुतल्यास आराम मिळतो. डोळे आले असतील तर कोरफडीचा रस डोळ्यांना लावल्याने फायदा होतो.
अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्त विकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते. जळणं, भाजणं, आग होणं, पित्त होणं या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते.
रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑईल एकत्र करुन त्वचेला लावल्यास काळेपणा, सनबर्न, सुरकुत्या, पिंपल्स हे त्वचा विकार कमी होतात. त्वचा काळवंडली असल्यास कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास फायदा होतो.
कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात.
कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.