आता इंटरनेटचा पुढचा टप्पा वेब-3, 20 लाख रोजगार निर्माण होणार
इंटरनेटच्या मदतीनं लाखो तरुण चांगले रोजगार मिळवून प्रगती करत आहेत. आता इंटरनेटचा पुढचा टप्पा वेब-3 (web 3) येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामुळं केवळ तंत्रज्ञानाचे जगच बदलणार नाही तर भारतात 20 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होतील. यामुळं आयटी क्षेत्राला यातून मोठी चालना मिळणार आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात, वेब-3 च्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि Metaverse च्या मदतीने भारतात 200 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
इंटरनेट वेब-3 ची नवीन आवृत्ती विकेंद्रित ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित असेल. या नवीन इंटरनेटमध्ये पुढील 10 वर्षांत देशात सुमारे 20 लाख उच्च पगाराच्या नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे.
, भारतात वेब-3 क्षेत्रात जवळपास 900 लहान-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. 2022 मध्ये जागतिक वेब-3 विकासामध्ये त्यांचा वाटा सुमारे 11 टक्के होता.
जगात वेब-3 डेव्हलपर्सचा तिसरा सर्वात मोठा पूल देशात तयार झाला आहे. याशिवाय नवीन लोकांनाही या क्षेत्रात कनिष्ठ स्तरावर सहज नोकऱ्या मिळतील.
इंटरनेटच्या वेब-3 आवृत्तीचा पुरवठा साखळी व्यवस्थापन, आरोग्यसेवा, आयटी, शिक्षण आणि ओळखपत्र क्षेत्रांवर थेट परिणाम होईल. या क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदल होतील
तंत्रज्ञानाचे जगच बदलणार नाही तर भारतात 20 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होतील. यामुळं आयटी क्षेत्राला यातून मोठी चालना मिळणार आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात, वेब-3 च्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि Metaverse च्या मदतीने भारतात 200 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय निर्माण होईल