Drama Juniors 2024 : 'ड्रामा ज्युनियर्स' डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि श्री स्वामी समर्थच्या भूमिकेत

'ड्रामा ज्युनियर्स' हा लहान मुलांचा रिऍलिटी शो प्रेक्षकांची मन जिकंत आहे. छोट्या मुलांचे दमदार अभिनय प्रेक्षकांना चकित करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या वीकेंडला म्हणजेच ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला 'ड्रामा ज्युनियर्स’चा एक विशेष भाग प्रसारित होणार आहे.

जिथे हे आपले छोटे स्पर्धक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातला प्रसंग सादर करणार आहेत, तसेच श्री स्वामी समर्थ महाराज याची माहिती सांगणारा प्रसंगही इथे सादर होणार आहे.
या सादरीकरणातून 'ड्रामा ज्युनियर्स' ने परिक्षक आणि प्रेक्षक या दोघांकडूनही प्रशंसा मिळवली आहे. लहान मुलांनी केलेल्या या उत्कृष्ट सादरीकरणातून मोठ्यापासून ते लहान प्रेक्षकवर्ग कडून अपार प्रेम आणि कौतुक मिळत आहे.
या विशेष भागाद्वारे 'ड्रामा ज्युनियर्स' ने शिक्षणाला मनोरंजनाची जोड देण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा पाहायला विसरू नका 'ड्रामा ज्युनियर्स' शनि - रवि रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.