Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ढोल-ताशाच्या गजरात झी मराठी अवॉर्ड्स 2024 वोटिंग फ्लॅग ऑफ !
गणेशोत्सव आणि गौरी आगमनाच्या शुभमुहूर्तावर ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ मतदान प्रक्रियेला एका भव्य फ्लॅग ऑफ समारंभात प्रारंभ झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझी मराठी यंदा आपलं २५ वर्ष साजरं करत आहे.
त्यामुळे यंदाचा झी मराठी अवॉर्ड खास असणार हे नक्की.
'नवरी मिळेल हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकांच्या तुमच्या लाडक्या कलाकारांनी पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात फ्लॅग ऑफ केला.
महाराष्ट्रभरात होणाऱ्या या मतदान प्रक्रियेत प्रेक्षकांनी भरभरून मतदान करण्याचं आवाहन आपले कलाकार करत आहेत.
वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भुमीजा पाटील, सानिका काशीकर, प्रसाद लिमये , अक्षय म्हात्रे, अक्षया हिंदळकर , यांनी प्रेक्षकांना मतदानाचं आवाहन केलं
त्यामुळे प्रेक्षक वर्ग ही खूप आनंदात आहे आणि आपल्या आवडत्या कलाकाराना वोट करायला तयार आहे.
२५ दिवस चालणाऱ्या या मतदान प्रक्रियेची शेवटची तारीख असणार आहे ५ ऑक्टोबर २०२४.
यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राइझेस घेऊन येणार आहे.
तेव्हा उत्सवाची तयारी सुरु करा.
झी मराठीवरील आपल्या आपल्या आवडत्या कलाकारांना आणि मालिकेला भरभरून मत द्या.