Railway Ticket PNR : रेल्वे तिकिटामधील पीएनआरचा अर्थ काय असतो? दहा अंकी क्रमांकामध्ये लपलेले असतात चार अर्थ
भारत जगातील रेल्वे जाळ्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर असून आशिया खंडात पहिल्या स्थानावर आहे. भारतातील रेल्वे ट्रॅक 68 हजार किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात जवळपास 13200 पॅसेंजर ट्रेन आणि 7325 रेल्वे स्थानकं आहेत. तुम्ही जेव्हा रेल्वेनं प्रवास करता त्यावेळी तुम्हाला पीएनआर क्रमांक दिला जातो.
पीएनआरला पॅसेंजर नेम रेकॉर्ड असं म्हटलं जातं. या क्रमांकावर प्रवाशाची सर्व माहिती नोंद असते. तिकीट आरक्षित करताना पीएनआर नंबर तयार केला जातो. आपण आरक्षण केल्यानंतर आपल्याला कन्फर्म सीट मिळाली की नाही हे तपासण्यासाठी पीएनआर क्रमांक फायदेशीर ठरतो.
आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर पीएनआर स्टेटस पर्यायावर क्लिक करुन आपण आरक्षित केलेल्या तिकिटाची स्थिती काय आहे ते पाहता येतं. याशिवाय पीएनआर क्रमांकाच्या मदतीनं एसएमएस द्वारे देखील तिकीट कन्फर्म झालं की नाही हे पाहता येतं.
पीएनआरमध्ये 10 अंक असतात,त्यापैकी पहिले तीन क्रमांक तिकीट कोणत्या विभागामधून देण्यात आलं हे दर्शवतं. मुंबई विभागाचा क्रमांक 8 असून इतर दोन अंक देखील विभाग दाखवतात. यानंतरचे 7 अंक ट्रेन क्रमांक , प्रवासाची तारीख, प्रवासाची माहिती दर्शवतात.रेल्वे प्रवासाबाबत इतर माहिती देखील तिकीटावर दिलेली असतेली.