Zee Mahagaurav 2022 : सिद्धार्थ-अमृता झाले सैराट, तर मयूर-प्रार्थनाच्या नृत्याचा थाट!
मराठी नाटक चित्रपटांचा गौरव झी मराठी ही वाहिनी आवर्जून करते. यंदाचा ‘झी गौरव’ (Zee Mahagaurav 2022) हा विशेष आहे, कारण या पुरस्कार सोहळ्यात गेल्या 21 वर्षातल्या, 21 महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करण्यात येणार आहे. हा महागौरव सोहळा म्हणजे प्रेक्षकांची मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘झी महागौरव’ या पुरस्कार सोहळ्यात गेल्या 21 वर्षातील चित्रपटांमधील कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शकांचा यांचा केलेला गौरव प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
या पुरस्कार सोहळ्यात मनोरंजनाचा धमाका असणार आहे. सिद्धार्थ जाधव आणि अमृता खानविलकर यांचा ‘पुष्पा’ आणि ‘सैराट’ या सुप्रसिद्ध चित्रपटांच्या गाण्यांवरील धमाकेदार नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
‘झी गौरव’चं गाणं हे रसिक-प्रेक्षकांच्या ओठावर रूळलेलं आहे. हे गाणं ऐकल्यावर एक वेगळाच जोश अंगात संचारतो.
याच गाण्यावर कोरिओग्राफर मयूर वैद्य आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे दोघे 2 वेगळ्या शैलीच्या नृत्याचा संगम सादर करणार आहेत.
तसेच, ‘चला हवा येऊ द्या’मधील विनोदवीर हे प्रेक्षकांना त्यांच्या भन्नाट विनोदी स्किट्सने खळखळून हसायला भाग पाडतील.