Dr Nagraj Manjule : डायरेक्टर, अॅक्टर नागराज मंजुळे आता झाले डॉक्टर!
Dr. Nagraj Manjule D. Litt : लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांच्या नावापुढं आता डॉक्टर हे बिरुद लागणार आहे. मंजुळे यांचा डी वाय पाटील विद्यापीठाकडून (DY Patil University) मोठा सन्मान करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुळे यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
पिस्तुल्या (Pistulya), फॅंड्री (Fandry), सैराट (Sairat) आणि आता झुंड (Jhund) अशा एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती करत मंजुळे यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लेखन, दिग्दर्शनासह त्यांनी अनेक चित्रपटांमधून अभिनय देखील केला आहे.
त्यांच्या याच योगदानामुळं त्यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून D. Litt बहाल करण्यात आली आहे.
नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा हनुमंत लोखंडे यांनी सर्वात आधी ही बातमी चाहत्यांसाठी शेअर केली.
त्यांनी डॉक्टरेट पदवी स्वीकारतानाचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, अंधारलेल्या दिवसात एम.फिल किंवा SET/NET अशी तुमचा इच्छा होती. यासाठी पुणे विद्यापीठात चकरा मारतानाचे दिवस आठवतात.
नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे.
या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.
नवख्या कलाकारांसह केलेल्या या कलाकृतीचं दिग्गज कलाकारांनी कौतुक केलं आहे. मंजुळे यांनी याआधी फँड्री, सैराट हे सिनेमे दिग्दर्शित केले होते. यात सैराटनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मराठी चित्रपटाच्या इतिहासात 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला चित्रपट ठरला होता. त्याआधी फँड्री सिनेमाची देखील खूप चर्चा झाली होती. फँड्री या चित्रपटासह पिस्तुल्या या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
सोबतच मंजुळे यांनी अनेक चित्रपटांमधून अभिनय देखील केला आहे. फँड्री, सैराटमधील छोट्या भूमिकांसह नाळ चित्रपटात प्रमुख भूमिका त्यांनी केली होती. झुंडमध्येही ते दिसून आले आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दलच त्यांना डीवाय पाटील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली आहे.