Yami Gautam Net Worth: नवऱ्यापेक्षाही श्रीमंत आहे 'ही' अभिनेत्री, मोजकेच सिनेमे करुन झालीये कोट्यवधींची मालकीण

यामी गौतमने 2012 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनेत्रीचा पहिला चित्रपट 'विकी डोनर' होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या चित्रपटातून आयुष्मान खुरानानेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

यामुळेच यामीचे नशीब उजळले आणि त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. यामुळेच आज ही अभिनेत्री स्वतःच्या बळावर करोडोंची मालकिन बनली आहे.
यामी गौतमने प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे. पण ही अभिनेत्री तिच्या नवऱ्यापेक्षाही श्रीमंत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामी गौतमी आज जवळपास 99 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकीण आहे. एका चित्रपटासाठी ती 5 ते 8 कोटी रुपये मानधन घेते.
यामीची बहुतेक कमाई फक्त चित्रपटांमधून येते. पण याशिवाय ती ब्रँड शूट्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कमाई करते.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर यामी गौतम शेवटची 'आर्टिकल 370' चित्रपटात दिसली होती.