Urmila Matondkar Birthday: रंगीला गर्ल ते शिवसेनेची रणरागिणी...! उर्मिला मातोंडकरांचा भन्नाट प्रवास
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउर्मिला आपल्या स्पष्टवक्तेपणामुळं प्रसिद्ध आहे.
त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. आता त्या शिवसेनेत आहेत.
या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत झालेल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. उर्मिला यांनी अलिकडच्या काळात कंगना रनौतवरही आपल्या चिंतनशील आणि अभ्यासू वृत्तीने पलटवार केला.
कॉंग्रेस पक्षाने त्यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदारकीचं तिकीट देऊन रिंगणात उतरवलं. ती निवडणूक त्या हरल्या पण त्यांना मिळालेली मतं पाहता आपल्या विचारी आणि विवेकी संवाद कौशल्यातून त्यांनी चांगली लढत दिली.
कालांतराने उर्मिला आपल्या वैवाहिक जीवनात व्यग्र झाल्या. पण मार्च 2019 मध्ये त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्याला कारणही तसं होतं. उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यांच्या अभिनय कौशल्याबद्दल त्यांना फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
हिंदी इंडस्ट्रीत नायिका म्हणून त्यांनी शिरकाव केला तो 1991 मध्ये नरसिंहा या चित्रपटातून.
उर्मिला मातोंडकर हे नाव सिनेसृष्टीसह अखिल भारताला कळलं ते 1983 मध्ये. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला यांनी मासूम या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज वाढदिवस.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -