उर्फी जावेद 3 कोटी 66 लाख 90 हजार रुपयांना विकतोय हा ड्रेस, किंमत ऐकून लोक म्हणाले- EMI वर देणार का?
फॅशन आयकॉन उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. काहींना त्याची क्रिएटिव्हिटी आवडते तर कधी ती ट्रोल होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र यावेळी उर्फी जावेदने नवा निर्णय घेतला आहे.
ती तिचा खास ड्रेस विकत आहे, पण किंमती एवढ्या जास्त आहेत की हे ऐकून लोकांना धक्का बसतो.
उर्फी जावेद सोशल मीडियावर वेगवेगळ्या कपड्यांसह किंवा कधी तिच्या कल्पनांसह दिसते. यावेळी ती तिचा ड्रेस विकण्यासाठी आली आहे.
तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की तिला तिचा ड्रेस विकायचा आहे. तसेच त्याची किंमतसुद्धा सांगितली आहे .
उर्फी जावेदने सांगितले की तिला तिचा बटरफ्लाय ड्रेस विकायचा आहे. ज्याला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले.
ज्यांना तो खरेदी करायची आहे त्यांना 3 कोटी 66 लाख 99 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
आता या ड्रेसची किंमत 3.5 कोटी रुपये आहे हे ऐकून सर्व यूजर्स हैराण झाले. उर्फी जावेदच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
एका चाहत्याने लिहिले, 'मला हा ड्रेस ईएमआयवर मिळेल का?'