'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदान्ना ठरलीये भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी नायिका? 'श्रीवल्ली' म्हणाली..

'पुष्पा 2' चित्रपटाची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या चर्चेत आहे. नुकतीच 'गोवा फिल्म फेस्टिव्हल'च्या समारोप सोहळ्याला ही अभिनेत्री सहभागी झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जिथे अभिनेत्रीच्या किलर लूकची खूप चर्चा झाली होती.

त्याचवेळी आता बातम्या येत आहेत की, 'पुष्पा 2' साइन केल्यानंतर रश्मिका देशातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.
आता अभिनेत्रीने या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली असून सत्य सर्वांसमोर उघड केले आहे.
रश्मिका मंदान्ना 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हिरव्या रंगाच्या साडीत पोहोचली.
यादरम्यान, अभिनेत्री रेड कार्पेटवर उपस्थित असलेल्या पॅप्सशी बोलली. त्यानंतर तिला सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असा प्रश्न विचारण्यात आला. ज्याला उत्तर देताना रश्मिकाने सांगितले की, सर्व अफवा आहेत.
या चित्रपटासाठी रश्मिकाला 10 कोटी रुपये मिळाल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.
तिच्या फीमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी फी मानली जात आहे.
कारण या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी रश्मिकाने जवळपास 2 कोटी रुपये घेतले होते. (pc :रश्मिका मंदान्ना इंस्टाग्राम )