Top 10 Richest Bollywood Actress: 'या' आहेत बॉलीवूडच्या 10 सर्वात श्रीमंत अभिनेत्री, ऐश्वर्या रायची संपत्ती पाहून तर तुम्ही थक्क व्हाल
श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत पहिलं नाव आहे मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनचं. झी बिझनेसच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्याची एकूण संपत्ती 828 कोटी रुपये आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसऱ्या क्रमांकावर देसी गर्ल प्रियांका चोप्रा येते. प्रियांकाची एकूण संपत्ती 580 कोटी रुपये आहे.
बॉलिवूडची गंगूबाई आलिया भट्ट श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, तिची एकूण संपत्ती 557 कोटी रुपये आहे.
तर बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान चौथ्या क्रमांकावर आहे, तिची एकूण संपत्ती 440 कोटी रुपये आहे.
बॉलिवूडची लेडी सुपरस्टार दीपिका पदुकोणचं नाव पाचव्या क्रमांकावर आहे. दीपिकाची एकूण संपत्ती 314 कोटी रुपये आहे.
अनुष्का शर्मा सहाव्या स्थानावर आहे, तिची संपत्ती 255 कोटी रुपये आहे.
सातव्या क्रमांकावर बॉलिवूडची 'धक धक' गर्ल माधुरी दीक्षित आहे, तिची एकूण संपत्ती 248 कोटी रुपये आहे.
बॉलिवूडची बार्बी गर्ल कतरिना कैफ आठव्या क्रमांकावर आहे. कॅटची एकूण संपत्ती 217 कोटी रुपये आहे.
112 कोटींच्या कमाईसह 9व्या क्रमांकावर श्रद्धा कपूरचं नाव आहे.
10 व्या क्रमांकावर जॅकलिन फर्नांडिसचं नाव आहे, तिची एकूण संपत्ती 101 कोटी रुपये आहे.