Shalini Passi : सौंदर्य टिकवण्यासाठी दुधाने अंघोळ करते ही हसीना? वयाच्या 49 व्या वर्षीही दिसते अप्रतिम!
अनेक अभिनेत्री त्यांच्या ब्युटी टिप्सही चाहत्यांसोबत शेअर करतात, तर काही गोष्टी टाळतात. आम्ही तुम्हाला अशाच एका सौंदर्याबद्दल सांगणार आहोत, जी गेल्या वर्षी तिच्या रिॲलिटी शोमध्ये तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली होती. नुकतेच तिने तिच्या सौंदर्याचे रहस्यही उघड केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकदा चाहत्यांनाही तिच्या ब्युटी टिप्स जाणून घेण्याची उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सौंदर्याविषयी सांगणार आहोत, जिने वयाच्या 49 व्या वर्षीही अनन्या-सुहानाला सौंदर्यात मागे सोडले.
येथे आम्ही 49 वर्षीय रिॲलिटी टीव्ही स्टार शालिनी पासीबद्दल बोलत आहोत, जिने 2024 मध्ये गेल्या वर्षी नेटफ्लिक्स शो 'फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज' द्वारे आपली ओळख निर्माण केली होती.
ती तिच्या वेगळ्या आणि अनोख्या ब्युटी टिप्समुळे चर्चेत असते. या वयातही तिने आपले सौंदर्य आणि फिटनेस जपला आहे. तिच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा आहे, ज्याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
शालिनी पासीला 'फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज'मध्ये प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. याठिकाणी तिने तिचे प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ आणि ब्युटीबद्दल सांगितले.
या शोदरम्यान शालिनीने दावा केला होता की ती दुधाने आंघोळ करते, ज्याबद्दल नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. न्यूजलँड्रीला दिलेल्या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की ती खरोखर दुधाने आंघोळ करते का?
शालिनीने उत्तर दिले, 'मी दुधाने आंघोळ करत नाही. मला शोमध्ये काहीही स्पष्ट करायचे न्हवते. त्यामुळे काहीही विचारलं तरी ती 'हो'च उत्तर द्यायची. आमच्या भागात गाई, घोडे किंवा बकरी पाळण्यास मनाई आहे, त्यामुळे दुधाने आंघोळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
शालिनी ग्लॉइंग आणि हेल्दी स्किनसाठी घरगुती उपाय उत्तम मानतात. तिने सांगितले की ती घरगुती उपायांनी त्वचेची काळजी घेते. ती रोज बीटरूट स्मूदी पिते.