ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे राजकुमारी.. वयाच्या 21व्या वर्षी झाले होते तिचे पहिले लग्न; आता या अभिनेत्याची आहे दुसरी पत्नी!
चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांची पार्श्वभूमी त्यांच्या चाहत्यांना फारशी माहिती नाही. असंच काहीसं या अभिनेत्रीसोबत घडतंय. अनेक अप्रतिम चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये आपल्या सौंदर्यासोबतच आपल्या दमदार अभिनयाचे प्रदर्शन करणारी ही अभिनेत्री राजघराण्यातील आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजघराण्यातील या अभिनेत्रीने 2006 मध्ये एका साऊथ चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तीने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण केल्यानंतर या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि येथेही ती प्रसिद्ध झाली.
आम्ही बोलत आहोत हिंदी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री अदिती राव हैदरी, जीने काल 28 ऑक्टोबर रोजी तिचा 38 वा वाढदिवस साजरा केला .
अदिती हैदराबादच्या राजघराण्यातील आहे.अदितीचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबाद, तेलंगणा येथे झाला. अदितीचे आजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 या काळात हैदराबादचे पंतप्रधान होते हे तिच्या बहुतेक चाहत्यांना माहीत नसेल.
तिचे काका मोहम्मद सालेह अकबर हैदरी हे आसामचे माजी राज्यपाल होते. अदितीच्या वडिलांचे नाव एहसान हैदरी आहे आणि तिची आई विद्या राव, जी एक प्रसिद्ध गायिका होती, त्या पूर्वीच्या काळातील ठुमरी आणि दादरा गाण्यासाठी ओळखल्या जात होत्या. अदिती ही आमिर खानची पूर्व पत्नी किरण रावची लांबची बहीण आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आदिती राव हैदरी बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वीच विवाहित होती. 2009 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी तिचे पहिले लग्न बॉलिवूड अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत झाले.
पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि लग्नाच्या चार वर्षांनी म्हणजे 2013 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला, काही काळानंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याने तिच्या आयुष्यात प्रवेश केला .
आदितीने नुकतेच अभिनेता सिद्धार्थसोबत दुसरे लग्न केले, ज्याचे फोटो शेअर करून तिने सर्वांना आश्चर्यचकित केले. विशेष म्हणजे सिद्धार्थचे हे दुसरे लग्न आहे.
सिद्धार्थने 2003 मध्ये मेघना नारायणसोबत लग्न केले होते आणि दोघे 2007 मध्ये वेगळे झाले होते. आदिती आणि सिद्धार्थ यांची पहिली भेट 2021 मध्ये आलेल्या 'महा समुद्रम' चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली, जी काही काळानंतर प्रेमात बदलली. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या वर्षी दोघांनी गुपचूप लग्न केले.
जर आपण अदिती राव हैदरीच्या कामाबद्दल बोललो तर तिने तिच्या कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. 2006 मध्ये 'प्रजापती' या मल्याळम चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या आदितीने 'दिल्ली 6'मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
यानंतर तिने 'मर्डर 3', 'रॉकस्टार', 'फितूर' आणि 'पद्मावत' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तिने बहुतेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये साईड रोल्स केले आहेत.
ती शेवटची 'हिरामंडी' या वेबसिरीजमध्ये दिसली होती .