Dhanteras 2024 Wishes : धनत्रयोदशीनिमित्त मित्र-परिवाराला द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी, कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी, फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा...!
आनंदाचा प्रकाश तुमचे जीवन उजळून टाको आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने समृद्धी आणि यश मिळो. धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा...!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी कंदील, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
दिवाळी आली सोनपावली, उधळण झाली सौख्याची, धनधान्यांच्या भरल्या राशी घरी नांदू दे सुख समृद्धी… धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा...!
धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
धन धान्याची व्हावी घरीदारी रास राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आला आला दिवाळीचा सण घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)