In Pics : 'आज फिर जिने की तमन्ना है...'; वहीदा रेहमान, आशा पारेख आणि हेलन यांच्या सहलीचे फोटो व्हायरल
'आज फिर जिने की तमन्ना है...' या गाण्याच्या ओळी इतक्या समर्पक आहेत की, त्या गुणगुणत असताना सारे पाश तोडून स्वच्छंदी आयुष्याच्याच दिशेनं आपण झेप घेतल्याची अनुभूती होते. सध्या हिंदी कलाविश्वात एक काळ गाजवणाऱ्या वहीदा रेहमान, हेलन आणि आशा पारेख या ज्येष्ठ अभिनेत्रींच्या सहलीची छायाचित्र पाहताना याचा प्रत्यतही येत आहे. वाढच्या वयाचा आकडा आणि त्यासोबत ओघाओघानं येणारी सारी बंधनं पाहुन हे त्रिकुट अंदमान येथे सहलीसाठी गेलं होतं, तेथील ही छायाचित्र.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिर्माते तनुज गर्ग यांनी या अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
काही दिवसांपूर्वी शायना एनसी यांनीही अंदमानच्या समुद्रकिनाऱ्यावर या तिनही एव्हरग्रीन अभिनेत्रींसोबतचा फोटो शेअर केला होता.
गप्पा म्हणू नका किंवा मग एखाद्या नयनरम्य ठिकाणाचं दृश्य डोळ्यांत साठवणं म्हणू नका, प्रत्येक क्षण त्या जगत होत्या.
वहीदा रेहमान यांच्या मुलीनं यापूर्वी त्याच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त स्नोर्कलिंग करतानाचा एक फोटो शेअर केला होता.
मदर्स डेच्या दिवशीही तिनं असाच एक लक्षवेधी फोटो शेअर केला होता.