मानधनाच्या बाबतीत दाक्षिणात्य अभिनेत्री देत आहेत बॉलिवूडकरांना टक्कर
कन्नड, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये झळकणारी अभिनेत्री प्रियामणी ही 2.5 कोटी रुपये ते 3 कोटी रुपये इतकं मानधन तिच्या एका चित्रपटासाठी आकारत असल्याचं म्हटलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री तमन्ना भाटीया हे नाव हिंदी आणि दाक्षिणात्य कलाविश्वासाठी नवं नाही. तमन्ना एका चित्रपटासाठी जवळपास 90 लाख ते 1 कोटी रुपये इतकं मानधन घेते.
दाक्षिणात्य कलाविश्वात कमालीची प्रसिद्धीझोतात असणारी आणखी एक अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी. हिंदी अभिनेत्रींना लोकप्रियतेच्या आणि मानधनाच्या बाबतीत टक्कर देणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अनुष्काचाही समावेश होतो. एका चित्रपटासाठी ती किमान 2.5 कोटी रुपये किंवा त्याहून जास्तीचं मानधन घेते.
आपल्या अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री किर्ती सुरेश ही एका चित्रपटासाठी जवळपास 2 कोटी रुपये इतकं मानधन घेते.
दाक्षिणात्य कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री काजल अग्रवाल ही, 'सिंघम' आणि 'स्पेशल 26' सारख्या हिंदी चित्रपटांतूनही झळकली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काजल एका चित्रपटासाठी किमान 2 कोटी रुपयांचं मानधन आकारते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -