In Pics : 'हरियाणवी पोरी, बॉलिवूडवर भारी', 'या' अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर दिले सुपरहिट चित्रपट
या यादीतलं पहिलं नाव आहे बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री मल्लिका शेरावतच. मल्लिकानं अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. आता ती सिनेमाच्या जगापासून जरा लांब आहे मात्र तिच्या चाहत्यांमध्ये काही कमी आलेली नाही. मल्लिकाचा जन्म हरियाणाच्या हिसारमधल्या एका छोट्या गावात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेघना मलिक हरियाणाच्या सोनीपतची राहणारी आहे. मेघना मलिकनं देखील आपल्या करिअरच्या सुरुवातीला छोट्या पडद्यावर काम केलं. त्यानंतर तारे जमीन पर सह अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली.
बॉलिवूडची राधा म्हणजे जूही चावला हरियाणाच्या अंबालाची. जूही चावला 90 च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये काम करतेय. तिनं आजवर अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
हरियाणाच्या गुरुग्राममध्ये जन्मलेल्या निकुंज मलिकनं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली होती. ‘रिव्हॉल्वर रानी’ या चित्रपटाद्वारे तिनं पदार्पण केलं.
हरियाणाच्या अंबालामध्ये जन्मलेल्या अभिनेत्री परिणीती चोप्रा नुकतंच‘द गर्ल ऑन द ट्रेन’ मध्ये दिसून आली. परिणीती चोप्रानं एकाहून एक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.
हरियाणातून आलेल्या या अभिनेत्रींनी आपल्या अदाकारीच्या बळावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या यादीत जूही चावला ते मल्लिका शेरावत पासून परिणीती चोप्रापर्यंत अभिनेत्रींचा समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -