Jacqueline Fernandez पासून Shanaya Kapoor पर्यंत, कोणाचा आहे आलिशान बेडरुम?
खुशी कपूर: खुशीनेही तिच्या बेडरुमची एक झलक दाखवण्यासाठी फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती अलीशान पलंगावर पोज जेताना दिसत आहे.
सोनम कपूरनेही तिच्या सुंदर बेडरूमची झलक दाखवण्यासाठी फोटोशूट केले आहे. या फोटोत ती पुस्तक वाचताना दिसत आहे तर तिचा नवरा आनंद आयपॅडवर काहीतरी पहाताना दिसतोय.
करीना कपूर खान अलीकडेच तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे, तिथून तिने तिच्या बेडरूमचा फोटो शेअर केला आहे. फोटोत करीना तैमूर आणि सैफबरोबर बेडवर बसलेली दिसत आहे.
श्रद्धा कपूरने तिचा बेडरूमचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या बेडरुममध्ये सुंदर सजावट केली आहे. बेडरुममध्ये अनेक फोटोंचे कोलाज भिंतीवर पहायला मिळेल.
अलाया फर्नीचरवालानेही सोशल मीडिया पोस्टमध्ये तिच्या बेडरूमची झलक दाखविली आहे. तिचा बेडरूम खूप सुंदर दिसत आहे.
आलिया भट्टने बेडरूममध्ये क्लिक केलेला हा भावनिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तिचे वडील अंथरुणावर बसले असताना तिला कुशीत घेताना दिसत आहेत.
शनाया कपूरने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं नाही. मात्र, तरीही ती सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. शनायानेही तिच्या बेडरूममध्ये काही क्लिक केले आहेत.
जॅकलिन फर्नांडिजने तिच्या बेडरूममध्ये एक फोटोशूट केले होते, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जॅकलीनने एकापेक्षा सरस पोज दिल्यात.
बॉलिवूड स्टार्सची आलिशान घरं नेहमीच चर्चेत असतात. लाखो कमाई करणार्या सेलिब्रिटींच्या घरांची छायाचित्रे पाहण्यास चाहते उत्सुक असतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या स्टार्सच्या बेडरूमची एक झलक दाखवणार आहोत, जिथे ते शूटिंगनंतर आराम करतात.