Bollywood Highest Taxpayers: कोणता बॉलीवूड अभिनेता भरतो सर्वात जास्त कर? 'ही' आहे अभिनेत्यांची यादी
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक कर भरणारा अभिनेताअक्षय कुमार आहे.आयकर विभागाने 2022 मध्ये त्याबाबत घोषणा केली होती. अक्षय कुमारने 2022 मध्ये एकूण 29.5 कोटी रुपयांचा कर भरला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षय कुमारची एकूण संपत्ती 2000 कोटी रुपये आहे. तो एकमेव भारतीय अभिनेता आहे ज्याचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या फोर्ब्स ग्लोबल यादीमध्ये समावेश आहे.
अहवालानुसार अक्षय कुमारची वार्षिक कमाई ४८६ कोटी रुपये आहे.
बॉलीवूडचे बीग बी हे देखील सर्वाधिक कर भरणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये आहेत. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये अमिताभ बच्चन यांनी 70 कोटी रुपयांचा कर भरला होता.
अहवालानुसार अमिताभ बच्चन यांची वार्षिक मिळकत 3396 कोटी रुपये आहे.
ऋतिक रोशन याचे देखील या यादीमध्ये नाव आहे. ऋतिक रोशन दरवर्षी जवळपास 25.5 कर भरतो.
शाहरुख खानची वार्षिक मिळकत ही 5910 कोटी रुपये आहे. त्याने 2022 या आर्थिक वर्षात 22 कोटी रुपयांचा कर भरला होता.
सलमान खान याने देखील जवळपास 44 कोटी रुपयांचा कर भरला होता.
कपील शर्मा हा दरवर्षी 23.9 कोटी रुपये कर भरतो.
या यादीमध्ये अभिनेत्री दिपिका पदुकोण हिचा देखील समावेश आहे. दिपिकाने 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये 10 कोटी रुपयांचा कर भरला होता.