Soyrik : 'सोयरीक' चित्रपटातील गोंधळाला अजयचा स्वरसाज
नवरात्रोत्सवानिमित्त गायक, संगीतकार अजय गोगावले यल्लमा देवीचा जागर करीत गोंधळ घालताना दिसून येत आहे. (Photo : @ajayatulofficial/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'नाईंटीनाईन प्रोडक्शन्स' आणि 'बहुरूपी प्रोडक्शन्स' यांची निर्मिती असलेल्या आगामी सोयरीक चित्रपटासाठी त्याने हा गोंधळ घातला आहे. (Photo : @ajayatulofficial/IG)
आपल्यातील स्वार्थ, आणि निस्वार्थाची लढाई यात असणाऱ्या धूसर रेषेत तुमची सोयरीक अवलंबून असते. हे या चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. (Photo : @ajayatulofficial/IG)
गोंधळाबद्दल बोलताना अजय गोगावले सांगतात की, जोगवानंतर सोयरीक चित्रपटामुळे मला परत गोंधळ गाण्याची संधी मिळाली आहे. (Photo : @ajayatulofficial/IG)
मकरंद माने लिखित, दिग्दर्शित आणि विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने निर्मित सोयरीक हा कौटुंबिक धाटणीचा मनोरंजक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo : @ajayatulofficial/IG)
डोई धरीला धरीला आईचा देव्हारा, भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा...पाला लिंबाचा बांधिला, तुझा मळवट भरीला, तुझी भरून गं वटी, तुला निवद दाविला...आई गोंधळ मांडिला ये गं तू जागरा, येल्लू आईचा उधं उधं...असे या गाण्याचे बोल आहेत.(Photo : @ajayatulofficial/IG)