Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIRAL STORY: काय सांगता? महिलेनं 21 दिवसांत केलं 15 लोकांना डेट..
काही लोकांना असा छंद असतो की, ते सतत वेगवेगळ्या लोकांना भेटतात आणि त्यांच्याशी ओळख वाढवतात. पण, काही लोक तर याबाबतीत रेकॉर्डचं तोडतात. असाच रेकॉर्ड एका महिलेनेही मोडलाय. हेलन चिक (Helen Chik) या घटस्फोटित महिलेने सांगितले की, तिने 21 दिवसांत तब्बल 15 लोकांना डेट केले आहे.(photo:helenchikx/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया महिलेने डेट केलेली सगळीच मंडळी न्यूयॉर्कमधील आहेत. या बाई एक लेखिकाही आहेत. तिने स्वतःचे अनुभव तिच्या पुस्तकातून लोकांसमोर मांडले आहेत.(photo:helenchikx/ig)
डेली स्टारच्या बातमीनुसार, हेलन चिक या महिलेने डेटिंगवर एक पुस्तक लिहिले आहे. ज्यामध्ये तिने टिंडर या अॅपवर खरे प्रेम शोधण्याच्या टिप्स देखील दिल्या आहेत.(photo:helenchikx/ig)
विल स्मिथचा 'किंग रिचर्ड्स' हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामावर आधारित आहे. चित्रपटाचे कथानक टेनिसपटू सेरेना, व्हीनस विल्यम्सचे वडील आणि प्रशिक्षक रिचर्ड विल्यम्स यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विल स्मिथनं या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.(photo:helenchikx/ig)
तसेच अनजानु एलिस, सानिया सिडनी, डेमी सिंगलटन, टोनी गोल्डविन आणि जॉन बर्नथल या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेनाल्डो मार्कस ग्रीन (Reinaldo Marcus Green) यांनी केलं आहे. ऑस्कर पुरस्कार स्विकारल्यानंतर स्पिच देताना विल म्हणाला, 'कोणतीही कला ही आयुष्याची कॉपी करत असते. मी रिचर्ड विलियम्ससारखा वाटतो.तो क्रेझी फादर आहे, असं वाटतं. '(photo:helenchikx/ig)
हेलनच्या पुस्तकाचे नाव आहे ‘सेक्स, स्वाइप अँड अदर स्टोरीज’. या पुस्तकामध्ये तिने ऑनलाईन प्रेम शोधण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल सांगितले आहे. हेलनचा असा दावा आहे की, आधुनिक काळात रोमान्सच्या शोधात असलेल्या लोकांचा तिला पाठिंबा आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीदरम्यानही तिने डेटिंगबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याचवेळी हेलनने खुलासा केला की, न्यूयॉर्कच्या प्रवासादरम्यान तिने केवळ 21 दिवसांत 15 लोकांना डेट केले.
हेलनचा स्वतःच दोन वेळा घटस्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या घटस्फोटाबद्दलही अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया आहेत. घटस्फोटाबाबत अनेक लोकांची विचारसरणी अजूनही पारंपारिक आणि जुनाट आहे. मात्र, यात खुल्या मनाचेही अनेक लोक आहेत.(photo:helenchikx/ig)
21 दिवसांत 15 लोकांना डेट करण्याचा अनुभव सांगताना हेलन म्हणाली की, ‘वेळ हे अशी गोष्ट आहे, जी परत परत येत नाही. त्यामुळे मी वेळेबाबत खूप वक्तशीर आहे. जेव्हा तुम्ही नवीन शहरात जाता, तेव्हा तुम्हाला ठिकाणे बदलावी लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही अशा लोकांना भेटता, ज्यांना तुम्ही शारीरिकदृष्ट्या ओळखतही नाही.’(photo:helenchikx/ig)