पहिल्यांदाच इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आले 'हे' फीचर्स, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
Okinawa ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okhi 90 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 160 किमीचा पल्ला गाठू शकते, असा कंपनीने दावा केला आहे. या स्कूटरची टॉप स्पीड 90 किमी प्रतितास इतकी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOckhi 90 फक्त दहा सेकंदात 0 ते 90 किमी प्रतितास वेग पकडू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच ही स्कूटर 1 तासात 80 टक्के चार्ज होते आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी 3 ते 4 तासांचा वेळ लागतो, असं ही कंपनीचं म्हणणं आहे.
या स्कूटरमध्ये 3800W मोटरसह 72V 50AH लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. यात ओकिनावा प्रेरित एलईडी हेडलाइट, एलईडी डीआरएल, 16-इंच अलॉय व्हील, क्रोम-फिनिश्ड मिरर, अॅल्युमिनियम ब्रेक लीव्हर आणि एलईडी ब्लिंकर्स देखील कंपनीने दिले आहे.
Ockhi 90 चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल - ग्लॉसी वाईन रेड, ग्लॉसी पर्ल व्हाइट, ग्लॉसी अॅश ग्रे आणि ग्लॉसी ज्वेलरी ब्लू.
जिओ फेन्सिंग, नेव्हिगेशन, स्पीड अलर्ट, रायडिंग हिस्ट्री, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोबाईल चार्जिंग यूएसबी-पोर्ट आणि ड्रायव्हर स्कोअर यासारखे स्मार्ट फीचर्स यात देण्यात आले आहेत.
दिल्ली आणि महाराष्ट्रात सबसिडीनंतर याची किंमत सुमारे 1.03 लाख रुपये आहे.