ZEE MARATHI AWARD 2024 देवींच्या अवतारात नायिकांचं धमाकेदार सादरीकरण !
झी मराठी अवॉर्ड २०२४- देवींच्या अवतारात नायिकांचं धमाकेदार सादरीकरण ! झी मराठीच्या नायिकांचं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार नवशक्तींचं सादरीकरण !
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाचा 'झी मराठी अवॉर्ड २०२४' खास असणार आहे, या सोहळ्यात अनेक सर्प्राइझेस, धमाकेदार सादरीकरण आणि झी मराठीचा २५ वर्षाचा अद्भुत प्रवास साजरा होणार आहे.
हा सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे आणि या दिवाळीत प्रेक्षकांना अद्वितीय गोष्टी पहायला मिळणार आहेत त्यामुळे ही दिवाळी आणखी आनंदात जाणार आहे.
या वर्षी, झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांतील नायिका – पारू, शिवा, अप्पी, अक्षरा, वसुंधरा, नेत्रा, तुळजा आणि लीला – या नवशक्ती एकत्र येऊन धमाकेदार सादरीकरण करणार आहेत.
या ऍक्टच्या अनुभवाबद्दल बोलताना, या अभिनेत्री म्हणाल्या, हा एक रोमांचक अनुभव होता कारण पहिल्यांदाच आम्ही सर्वजणी एकाच मंचावर एकत्र सादरीकरण करत होतो, आणि तेही अशा ऐतिहासिक प्रसंगी.
एकमेकांकडून शिकण्याचा आणि एकत्र वेळ घालवण्याचा हा एक संस्मरणीय अनुभव होता. आम्हाला आशा आहे की प्रेक्षकांना आमचं हे खास सादरीकरण आवडेल.
झी मराठीच्या २५ वर्षांच्या या विशेष उत्सवात, प्रेक्षकांना एकत्र येऊन या अद्वितीय सादरीकरणाचा घरबसल्या अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
तेव्हा अनुभवायला विसरू नका एक अविस्मरणीय सोहळा 'झी मराठी अवॉर्ड २०२४'
२६ आणि २७ ऑक्टोबरला संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.