Success Story : कधी रद्दी विकून काढले दिवस, आता दररोज कमावते लाखो रुपये; 'या' फोटोतील मुलगी सध्या प्रसिद्ध अभिनेत्री
Guess Who : टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कुणीही गॉडफादर नसतानाही या अभिनेत्रीने मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली.(Image Source : divyankatripathi)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्रीवर अशीही एक वेळ होती, जेव्हा तिला रद्दी विकून खर्च भागवावा लागत होता. पण, आता हिचं अभिनेत्री आता लाखो रुपये फी घेत आहे.(Image Source : divyankatripathi)
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून टीव्ही इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आहे.(Image Source : divyankatripathi)
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘बनूं मैं तेरी दुल्हन’ या मालिकेपासून केली. पहिल्याच मालिकेमुळे दिव्यांकाला प्रसिद्धी मिळाली. ती रातोरात स्टार झाली.(Image Source : divyankatripathi)
यानंतर ‘ये हैं मोहब्बतें’ मालिकेतील इशिताच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. या मालिकेमुळे दिव्यांकाला स्टारडम मिळालं. आजही तिला प्रेक्षक इशिता या नावाने ओळखतात.(Image Source : divyankatripathi)
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा टीव्ही इंडस्ट्रीमधील हा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. (Image Source : divyankatripathi)
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, माझ्या आयुष्यात असाही एक काळ होता, जेव्हा तिने रद्दी विकून खर्छ भागवला होता. त्यानंतर मला थोडे-फार पैसे मिळाले की, मी सोन्याचं नाणं खरेदी करायची आणि वाईट परिस्थिती आली की, ते सोनं विकून घर चालवायची.(Image Source : divyankatripathi)
सध्या दिव्यांका त्रिपाठी छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती मालिकेच्या एका एपिसोडच्या चित्रिकरणासाठी सुमारे दीड लाख रुपये मानधन घेते.(Image Source : divyankatripathi)
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची एकूण संपत्ती 48 कोटींची आहे.(Image Source : divyankatripathi)
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने 2016 मध्ये अभिनेता विवेक दहिया याच्यासोबत लग्न केलं, दोघांची भेट ‘ये हैं मोहब्बतें’ मालिकेच्या सेटवर झाली होती. (Image Source : divyankatripathi)