Govinda Net Worth : अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर, तरही जगतो लक्झरी लाईफ; अभिनेता गोविंदाची कमाई कुठून होते?
90 च्या दशकात अभिनेता गोविंदाने बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली. त्याच्या डान्स आणि अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा चित्रपटांपासून दूर आहे. 2019 मध्ये आलेल्या रंगीला राजा चित्रपटात तो झळकला, त्यानंतर त्याने कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही.
गोविंदाने 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या गोविंदा चित्रपटांपासून दूर असला तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
गोविंदा नेहमी त्याच्या चाहत्यांसोबत फोटो आणि वैयक्तिक आयुष्याबाबतचे अपडेट शेअर करत असतो.
गोविंदा अलिकडे कोणत्या चित्रपटात झळकला नसला, तरी तो लक्झरी लाईफ जगतो. त्याच्या कमाईचं नेमकं साधन काय? ते जाणून घ्या.
गोविंदाने त्याच्या करिअरमध्ये 'हीरो नंबर वन', 'दुल्हे राजा', 'आंटी नंबर वन', 'राजा बाबू', 'कर्ज', 'स्वर्ग', 'शोला और शबनम' यांसारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदा आज 160 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे, त्याने चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या साईड बिझनेसमधून मोठी कमाई केली आहे.
गोविंदा चित्रपटांपासून दूर राहिल्यापासून प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतो.
मुंबईत गोविंदाची एक नाही तर तीन घरे आहेत. याशिवाय त्याची अमेरिकेतही मालमत्ता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदाचे रायगडमध्ये एक आलिशान फार्महाऊस देखील आहे.
प्रॉपर्टीशिवाय अभिनेता गोविंदा हॉटेल्स आणि इतर व्यवसायांतूनही दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.
गोविंदा त्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त ब्रँड एंडोर्समेंट आणि रिॲलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारून खूप कमाई करतो