सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे या मालिकेतून पून्हा दिसणार छोट्या पडद्यावर!
सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) तब्बल 12 वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे.(PHOTO:urmilakothare/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे.(PHOTO:urmilakothare/IG)
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना ऊर्मिला म्हणाली, खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहसोबत आणि अर्थातच स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांच्यासोबत खूप जुनं नातं आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे.(PHOTO:urmilakothare/IG)
बऱ्याच काळानंतर उर्मिला मालिकेतून दिसणार असल्याने प्रेक्षक देखील या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत .(PHOTO:urmilakothare/IG)
उर्मिला देखील मालिकेत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.(PHOTO:urmilakothare/IG)
तुझेच मी गीत गात आहे ही मालिका 2 मे पासून रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर सुरु होणार आहे.(PHOTO:urmilakothare/IG)