PHOTO : ‘बिग बॉस’ विजेती तेजस्वी प्रकाश रमली बाप्पाच्या भक्तीत, गणपतीसाठी बनवला मोदकांचा प्रसाद!
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘बिग बॉस;चं विजेतेपद पटकावल्यानंतर आता ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री तेजस्वी प्रकाश अभिनेता करण कुंद्रा याला डेट करत आहेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.
आता सगळीकडे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धूम दिसत आहे.
नुकतेच अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री गणपती बाप्पाच्या सेवेत रममाण झालेली दिसत आहे. तिच्या सोबत तिचे कुटुंब देखील दिसत आहे.
काही फोटोंमध्ये तिच्यासोबत अभिनेता करण कुंद्रा देखील दिसत आहे.
गणपती बाप्पासाठी तेजस्वीने मोदकांचा प्रसाद देखील बनवला आहे.
तेजस्वी प्रकाशच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Photo : @ xtejasswiprakash/IG)