In Pics : सुगंधा मिश्राकडून पती संकेत भोसलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा, फोटो शेअर करत लिहिलं...
'द कपिल शर्मा शो' फेम सुगंधा मिश्रा ही कॉमेडियन संकेत भोसलेसोबत 26 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकली. काही वर्षांपासून ते सोबत होते. (Image courtesy - @sugandhamishra23/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुगंधा आणि संकेत दुबई येथे एका कार्यक्रमात पहिल्यांदा भेटले होते. आज पती संकेत भोसलेच्या वाढदिवसानिमित्त सुगंधाने एक मेसेज सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Image courtesy - @sugandhamishra23/Instagram)
सुगंधाने लिहिलं की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा संकेत. तुझी भेट होईपर्यंत मला कधीच माहित नव्हते सोलमेट म्हणजे काय. तू जे काही आहेस आणि माझ्यासाठी जे काही करतोयस त्यासाठी थँक्स. तू माझा सोबती आणि मित्र आहेस... वाढदिवसाच्या शुभेच्छा. (Image courtesy - @sugandhamishra23/Instagram)
संकेत आणि सुगंधा यांच्या लग्नानंतर कोरोना नियामांचा भंग केल्याबद्दल पोलिसांनी सुगंधाविरोधात FIR नोंद केली आहे. लग्नाचा व्हिडीओ व्हायरस झाल्यानंतर संकेतचे कुटुंबीय आणि हॉटेल स्टाफ विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Image courtesy - @sugandhamishra23/Instagram)
सुगंधा द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आली. तर संकेत भोसले संजय दत्त आणि सलमान खानची मिमिक्री उत्तमरित्या करतो. त्याने देखील अनेक शोज मध्ये आपल्या मिमिक्रीची झलक दाखवली आहे. (Image courtesy - @sugandhamishra23/Instagram)