In Pics : Star Pravah Parivar Puraskar : अरुंधती ठरली सर्वोत्कृष्ट आई तर सर्वोत्कृष्ट खलनायिका संजना!
परिवार असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. जेव्हा सारे एकत्र येतात तेव्हा सोहळा होतो आनंदाचा, आपुलकीचा आणि कौतुकाचा. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफुलाला सुगंध मातीचामधला शुभम आणि मुलगी झाली होमधला शौनक या दोघांना सर्वोत्कृष्ट नवरा पुरस्कार विभागून देण्यात आला
अरुंधतीला मिळाला सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार.
तर संजना ठरली सर्वोत्कृष्ट खलनायिका.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कारासाठी श्रीरंग गोडबोले, मंगल केंकरे, भरत जाधव, वैजयंती आपटे,मिलिंद इंगळे यांनी परिक्षणाची धुरा सांभाळली.
सर्वोत्कृष्ट मुलगी ठरली लग्नाची बेडी मालिकेतील सिंधू.
रंग माझा वेगळा मालिकेतील सौंदर्या इनामदार यांना मिळाला सर्वोत्कृष्ट सासुचा पुरस्कार.
सर्वोत्कृष्ट भावंड या पुरस्काराचे मानकरी ठरले सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील सूर्या, पश्या, वैभव आणि ओंकार
सर्वांचा लाडका होस्ट सिद्धार्थ चांदेकरला सर्वोत्कृष्ट सुत्रधाराचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य म्हणून मुरांबा मालिकेतील अक्षयला सन्मानित करण्यात आलं.
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य (स्त्री) पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकीचा सन्मान करण्यात आला
याशिवाय बालकराकारांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आलं
'नवे लक्ष्य' या मालिकेला देखील विशेष सन्मान पुरस्कार देण्यात आला.