In Pics | गुढी पाडव्यानिमित्त अभिजीत खांडकेकरचं पत्नीसोबत खास फोटोशूट
अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदा खांडकेकर यांनी गुढी पाडव्याच्या निमित्तानं एक खास फोटोशूट केलंय. त्यांचे हे फोटोज केवळ आपल्या सणाचं सेलिब्रेशन करण्यासाठी नाहीयेत तर त्यातून त्यांना एक संदेशही द्यायचाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या संकटामुळे इतर अनेक उद्योंगाबरोबरच हातमाग कामगार, भरतकाम करणारे कलाकार तसेच पारपंरिक वस्त्रनिर्मिती करणाऱ्या कामगारांना मोठा फटका बसला. त्यांची कला आधीच काळाच्या ओघात लूप्त होण्याच्या मार्गावर असताना कोरोनाने दिलेला दणका जीवघेणा ठरु शकतो.
यातून या कलाकारांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांचा आवाज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी याच कलाकार, कामगारांनी बनवलेले कपडे परिधान करुन अभिजीत आणि सुखदाने हे फोटोशूट केलंय आणि म्हणूनच हे स्पेशल आहे.
फोटोमध्ये सुखदाने नेसलेली साडी ही मध्यप्रदेशातल्या अनुभवी हातमाग वीणकारांनी तयार केलेली आहे. संपूर्ण रेशमी माहेश्वरी साडी आहे. तर अभिजीत ने परिधान केलेला कुर्ता हा भरतकाम केलेला मंगलगिरी सुती कुर्ता आहे.
मृण्मयी अवचट यांच्या निकाई फॅशन स्टुडिओच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय. केवळ ब्रँड्सच्या प्रेमात असलेल्या आजच्या पिढीसमोर आपल्याच मातीत, आपल्याच कलाकारांनी विणलेलं वस्त्र तेवढ्याच ताकदीनं पोहोचावं आणि या कठीण काळात या कलाकारांना, कामगारांना पुन्हा उभं राहाता यावं एवढाच या उपक्रमामागचा उद्देश्य आहे.
या उपक्रमात अभिजीत-सुखदाबरोबरच इतर अनेक हिंदी-मराठी कलाकार सहभागी झालेत.