Rubina Dilaik : अप्सरा आली... व्हाईट आऊटफिट, रेड लिपस्टिक; रुबिनाचा लूक फॅन्टास्टिक
'झलक दिखला जा' शोमध्ये तिचा पार्टनर सनम जोहर आहे. या कार्यक्रमाच्या शूटींग दरम्यानचे काही फोटो रुबिनाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये रुबिना व्हाईट कलरच्या कॉस्ट्युममध्ये फार सुंदर दिसत आहे. रुबिना दिलैकने या नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
रुबिना दिलैक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबिना दिलैकने अभिनयामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रुबिना दिलैक बिग बॉग सिझन 14 ची विजेती आहे. रूबिनाच्या 'छोटी बहू' आणि 'शक्ती' या छोट्या पडद्यावरील मालिकांनी रुबिनाला खरी प्रसिद्धी मिळाली.
'शक्ती' या मालिकेमधील रुबिनाच्या तृतीयपंथीच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
'छोटी बहू' रुबिना दिलैक मोठ्या पडद्यावरही झळकली आहे. 'अर्ध' या चित्रपटातून रुबिनाने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.
रुबिनाचा जन्म 26 ऑगस्ट 1987 रोजी शिमलामध्ये झाला. ती सध्या 35 वर्षांची आहे.
रुबिनाचं शिक्षण हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झालं आहे.
रुबिनाने 2006 साली मिस शिमला 2006 चा किताब जिंकला.
रुबिनाने मिस नॉर्थ इंडिया 2008 हा किताबही जिंकला आहे.