Cyber Crime: तुमच्या डॉक्युमेंटचा दुरुपयोग नाही ना? आयडीवर किती सिम आहेत अॅक्टिव्ह, असे पाहा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Nov 2022 11:12 AM (IST)
1
बाजारातून मोबाइल सिम कार्ड सहजपणे खरेदी केले जाते. त्यासाठी तुमचे काही दस्ताऐवज लागतात. आधार कार्डसारख्या दस्ताऐवजांवर सिम कार्ड मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बदलत्या काळातील तंत्रज्ञानानुसार डिजिटलायझेशनचा वापर वाढत आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढली आहे.
3
अनेकदा आपल्या कागदपत्रांचा दुरुपयोग करून सायबर गुन्हेगार सिम कार्ड खरेदी करतात.
4
https://tafcop.dgtelecom.gov.in/ या वेबसाईटवर तुमचा मोबाइल क्रमांक नमूद करा. त्यानंतर ओटीपी येईल तो संबंधित रकान्यात नमूद करा.
5
तुमच्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहेत. हे तुम्हाला समजू शकणार आहे.
6
त्यानंतर तुमच्या नावावर नोंद असलेले सिम कार्ड क्रमांकांची यादी दिसेल.
7
तुमच्या नावावर इतर सिम कार्डचा वापर सुरू असेल तर त्याची तक्रार तुम्हाला वेबसाइटवर नोंदवता येईल.