Manasi Kulkarni : अभिनेत्रीने 10 वर्षांनी कमबॅक करत जिंकली प्रेक्षकांची मनं, गायत्री प्रभूच्या लूकनेही वेधलं लक्ष
गायत्री प्रभू... अतिशय हुशार आणि स्वावलंबी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफिनिशिंग कॉलेजची टॉपर आणि सध्या एका मोठ्या तारांकित हॉटेलमध्ये मॅनेजरचं काम सांभाळतेय.
वर्किंग वुमन असल्यामुळे मानसीचा लूक डिझाईन करताना फॉर्मल लूकवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
अभिनेत्री, नृत्यांगना आणि वेशभुषाकार अशी बहुरंगी ओळख असलेल्या शाल्मली टोळ्येने गायत्रीचा लूक डिझाईन केला आहे.
कॉटनच्या साड्या, ट्रेंडिंग ब्लाऊज आणि ऑक्सिडाईज ज्वेलरी असा परफेक्ट फॉर्मल लूक करण्याचं शाल्मलीने ठरवलं. गायत्रीच्या सौंदर्याने हा लूक आणखीनच खुलून आलाय.
गायत्री प्रभूची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी कुलकर्णी तब्बल 10 वर्षांनंतर मालिका विश्वात पदार्पण करतेय.
गायत्रीच्या भूमिकेला आणि तिच्या लूकला मिळणाऱ्या भरभरुन प्रतिसादाविषयी सांगताना मानसी म्हणाली, ‘मला साडी नेसायला खूप आवडतं. गायत्रीच्या लूकसाठी डिझाईन केलेल्या साड्या फारच सुरेख आहेत.