PHOTO | ती परी अस्मानीची...'सुख म्हणजे नक्की काय असतं?' मधल्या गौरीचा मेकओव्हर
स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' मालिकेतील गौरीला आतापर्यंत आपण साडीमध्ये पाहत आलोय. पण लवकरच मालिकेत गौरीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजयदीपच्या मित्रमंडळींनी आयोजित केलेल्या एका खास पार्टीसाठी गौरीने मेकओव्हर केला आहे.
पार्टी गाऊनमधला गौरीचा अंदाज पाहून जयदीपच्या मनात तर परी म्हणू की अप्सरा ही एकच भावना आहे. या पार्टीसाठीची सगळी तयारी जयदीपनेच केलीय. पार्टीमध्ये काय घालायचं, कसं वावरायचं या सगळ्या टिप्स जयदीपने गौरीला दिल्या आहेत.
हा सीन करताना सेटवरही नवा उत्साह संचारला होता. जयदीप गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं आहे. हेच प्रेम मालिकेतल्या या नव्या वळवला सुद्धा मिळेल हीच आशा आहे.
गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा स्वतःला या नव्या रुपात पाहून फारच भारावून गेलीय. संपूर्ण टीमने मिळून तिचा हा लूक डिझाईन केला आहे.