Esha Kansara Sangeet : ‘मॅडम सर’ फेम ईशा कंसारा अडकली लग्नबंधनात; शेअर केले संगीत सोहळ्याचे खास फोटो
Esha Kansara Sangeet Ceremony : ‘मॅडम सर’ फेम टीव्ही अभिनेत्री ईशा कंसारा लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ईशा कंसाराचा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला. (PC : @esharkansara/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलिकडेच ईशाने लग्नाचे फोटो शेअर करून तिच्या लग्नाची गोड बातमी चाहत्यांनी दिली. त्यानंतर आता तिने संगीत सोहळ्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (PC : @esharkansara/Instagram)
ईशा कंसाराने शेअर केलेले फोटो पाहता तिचा संगीत सोहळा मजेशीर क्षणांनी भरलेला होता हे स्पष्ट होते. सर्वांनी संगीत सेरेमनी खूप एन्जॉय केली. (PC : @esharkansara/Instagram)
'जिंदगी मेरे घर आना', 'मॅडम सर' आणि 'मुक्ती बंधन' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या ईशा कंसाराने आता लग्नगाठ बांधली आहे. (PC : @esharkansara/Instagram)
ईशा कंसाराने त्यांच्या संगीत सेरेमनीमध्ये पती सिद्धार्थ अमित भावसारसोबत संगीत खुर्ची खेळली. तसेच बुलेट राईडही केली. (PC : @esharkansara/Instagram)
याशिवाय ईशा कंसाराने लेहेंगा आणि शूज अशा युनिक कॉम्बिनेशनमध्ये दिसली. ईशाने शूज घालून जबरदस्त डान्स केला. (PC : @esharkansara/Instagram)
ईशा कंसारानेही तिच्या आईवडीलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या आई-वडिलांना मिठी मारून रडताना दिसत आहे. (PC : @esharkansara/Instagram)
ईशाने संगीत सोहळ्यासाठी निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता आणि बन हेअरस्टाईल केली होती. तर तिचा नवरा सिद्धार्थ काळ्या कुर्ता-पायजामामध्ये दिसला. (PC : @esharkansara/Instagram)
ईशाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Issa vibe!'. ईशा आणि सिद्धार्थच्या संगीत सेरेमनीचे फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (PC : @esharkansara/Instagram)