PHOTO : ‘लावणी क्वीन’ अभिनेत्री मेघा घाडगेची ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये धमाकेदार एंट्री!
‘मराठी बिग बॉस’च्या चौथ्या सीझनचा ग्रँड प्रीमिअर 2 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. या ग्रँड प्रीमिअर मधून बिग बॉसच्या घरात 16 सदस्यांची ग्रँड एन्ट्री झाली आहे. त्यापैकी एक आहे, मेघा घाडगे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेघाचा जन्म हा पुण्यात 29 मार्च 1980मध्ये झाला. आपल्या लावणी नृत्याने सर्वांवर भूरळ घालणारी मेघा अल्पावधीतच सर्वांच्या गळ्यातील ताईत झालीय.
'मला भूतानं पछाडलं' हे भरत जाधवचं सुपरहिट गाणं आठवतंय ना! मग, त्यात भरत जाधवची नायिका तर तुम्हाला माहितच असेल. हो तिच अभिनेत्री मेघा घाडगे.
मेघा अभिनेत्री लावणीसम्राज्ञी म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत लावणीसम्राज्ञी म्हणून मेघाचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आलेला आहे.
नुकताच मेघाला 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' देऊन सर्वोत्कृष्ट तरूण लावणीसम्राज्ञी म्हणून गौरव करण्यात आला आहे.
लावणी नृत्यात पारंगत असलेल्या मेघाने आजवर अनेक मराठी चित्रपटात आपली लावणी रसिकांसमोर सादर केली आहे. ‘पछाडलेला’, ‘पोपट’, ‘माहेरची माया’, ‘चल धर पकड’ यांसारख्या अनेक चित्रपटात ती झळकली आहे.
तिने 'माहेरची माया' मधून अभिनयात पदार्पण केले. 2017मध्ये मेघाने दिग्दर्शक कैलाश माळी यांच्या 'दंडित'मध्येही काम केलं आहे. यात अशोक समर्थ, मंगेश देसाई, अशोक शिंदे आणि निशा परुळेकर यांचाही समावेश होता.
'एकापेक्षा एक', 'अप्सरा आली' या झी मराठीवरील प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोमधील तिच्या डान्सची चांगलीच चर्चा झाली होती. या कार्यक्रमातील तिची अदा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. (Photo : @meghaghadge_official/IG)