In Pics | The Kapil Sharma Show च्या कलाकारांची एका एपिसोडची फी किती?
Kapil_Sharma_Show_Cast
1/8
'द कपिल शर्मा शो' हा छोट्या पडद्यावरील यशस्वी शोपैकी एक आहे. प्रेक्षकांच्या पसंतीमुळे टीआरपीमध्येही हा शो कायमच पुढे असतो. या शोच्या यशाचं श्रेय संपूर्ण टीमला जातं, पण कपिल शर्मा या शोचा यूएसपी आहे. यामुळे शोच्या कलाकारांची फी कोणत्याही बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाही.
2/8
सुत्रांच्या माहितीनुसार, कपिल शर्मा आतापर्यंत एका एपिसोडसाठी 30 ते 35 लाख रुपयांची फी घेत होता. परंतु आता कॉमेडी किंग कपिल शर्माने आपली फी वाढवली आहे. पुढच्या सीझनपासून त्याला एका एपिसोडसाठी तब्बल 50 लाख रुपये मिळणार आहेत.
3/8
कपिल शर्मा शोमध्ये नवज्योत सिंह सिद्धूच्या जागी आलेली अभिनेत्री अर्चना पुरणसिंहची फी 10 लाख रुपये प्रति एपिसोड आहे. अर्चना याआधीही अनेक कॉमेडी शोमध्ये जजच्या भूमिकेत होत्या.
4/8
कृष्णा अभिषेक या शोमध्ये 'सपना'ची व्यक्तिरेखा साकारतो, जी प्रेक्षकांनाही आवडते. कृष्णा देखील एका एपिसोडसाठी 10 ते 12 लाख रुपये फी घेतो.
5/8
किकू शारदा सुरुवातीपासूनच या शोचा भाग आहे. वेळोवेळी किकू शारदाने आपल्या व्यक्तिरेखांमध्येही बदल केला आहे. तो कपिल शर्माच्या निकवर्तीयांपैकी आहे. किकूला शोमध्ये काम करण्यासाठी 5 लाख रुपये फी मिळते.
6/8
भारती सिंहला कोण ओळखत नाही? टीवी शोसह ती अनेक पुरस्कार सोहळ्याचंही निवेदन करतानाही दिसते. यामुळे तिला एका शोसाठी 10 ते 12 लाख रुपये मिळतात.
7/8
चंदन प्रभाकर कपिल शर्माचा बालमित्र आहे आणि दोघांनी अनेक कॉमेडी शोमध्ये एकत्र काम केलं आहे. इतकंच नाही तर तो कपिलसोबत लाफ्टर चॅलेंजमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. चंदनची प्रति एपिसोड फी 7 लाख रुपये आहे.
8/8
द कपिल शर्मा शोच्या प्रमुख कलाकारांमध्ये अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा समावेश आहे. सुमोनाला एका एपिसोडसाठी 6 ते 7 लाख रुपये मिळतात.
Published at : 10 Apr 2021 01:54 PM (IST)